डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस मध्ये,फिरते ग्रंथालय - In India Live

Breaking News

12/10/2018

डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस मध्ये,फिरते ग्रंथालय



प्रफुल चव्हाण 

मुंबई दि.१२ भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि.१५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ३ वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यंदाच्या वर्षापासून रेल्वेमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरु करण्यात येत असून, याचा शुभारंभ १५ ऑक्टोबर पासून होणार आहे. मध्ये रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस या दोन गाडयांमध्ये रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु होत असून प्रवाश्यांना आता प्रवासातच वाचनांचा आनंद मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे मंत्री विनोद तावडे यांनी  पत्रकाद्वारे दिली आहे.

मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या दोन गाड्यांमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सचा (फिरते ग्रंथालय) उपक्रम सुरु होत असून, दि. १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन होत आहे. दि. १५ ऑक्टोबरपासून या दोन्ही रेल्वे गाड्यांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना विनाशुल्क वाचनसेवा देण्यास सुरुवात करणार आहेत, ही माहिती  विनोद तावडे यांनी दिली. संबंधित प्रवाशांनी या उपक्रमास सुयोग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही तावडे यांनी केले. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबई सीएसटीएम मधून सायंकाळी ५.१० मिनिटांनी पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि ६.१५ मिनिटांनी सीएसटीएम वरुन नाशिककडे जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ही वाचन सेवा सुरु होणार आहे.
x

No comments:

Post a Comment