महेश घोलप,इन इंडिया लाईव
मुंबई, दि. 30 : करंजे, ता. खानापूर, जि. सांगली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्ह्याचा योग्यरित्या तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य बच्चू कडू यांनी करंजे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीसावर कारवाई करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना केसरकर बोलत होते.
केसरकर म्हणाले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना कळल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पिडीत बालिका व तिची आई यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी झाल्यावर पिडीत बालिकेच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी तक्रार देतो असे पोलीसांना सांगितले. परंतु दुसऱ्या दिवशीही पालक न आल्याने पोलीसांनी प्रत्यक्ष पालकांना भेटून जबाब नोंदविला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
No comments:
Post a Comment