अजय कदम,इन इंडिया लाइव
रायगड: दि.16 नोव्हेंबर, सहयाद्री च्या कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील माथेरान हे पर्यटनस्थळ.येथे पर्यटकाना फिरण्यासाठी वेगवेगळे विलोभनीय असे 38 पॉईंट्स आहेत.त्यामध्ये आकाशगंगा नावाचा 39 वा पॉईंट हा नगरपरिषदेने खास खगोल प्रेमी पर्यटकांसाठी उभारला आहे.याच आकाशगंगा नावाच्या आकाश निरीक्षण केंद्रामध्ये उल्कापात पाहण्याची संधी मिळणार आहे.ही खगोल अभ्यासकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
माथेरानच्या अतिउंच भागात प्रसिद्ध पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली या आकाशगंगा निरीक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.या केंद्राचे सर्व काम मुंबई येथील युनायटेड सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीला देण्यात आले आहे.येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी दररोज आकाश दर्शन पहावयास मिळते.परंतु दि.18 नोव्हेंबर रोजीच्या रात्री एक वाजल्यानंतर पहाटेपर्यंत उल्कापात पाहण्याची संधी मिळणार आहे.मात्र उल्कापात कशी होते याकडे सर्व वैज्ञानिकांचे लक्ष लागून राहिले आहे .असे आकाशगंगा संचालक शैलेश संसारे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
उल्कापात पाहण्यासाठी माथेरानच का?
कोणत्याही शहरात गेलो तर प्रदूषण पहावयास मिळते.मुंबई मधून अवकाशाकडे पाहिले असता धूलिकण दिसून येतात त्यामुळे तारे सुद्धा स्पष्ट दिसत नाहीत.मात्र माथेरान हे प्रदूषण मुक्त असल्याने सर्वत्र गर्द झाडी असल्याने अवकाश निरभ्र दिसते.त्यामुळे या आकाशगंगा निरीक्षण केंद्रातून तारे,ग्रह स्पष्ट दिसतात.
उल्का म्हणजे काय ?
आकाशातील धूमकेतू तुन निघालेला एखादा घटक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आल्यावर तो पृथ्वीच्या वातावरणात फिरत रहातो वातावरणात घर्षण होऊन तो घटक फिरताफिरता पेट घेऊन समूळ नष्ट होतो त्यास उल्का म्हणतात.मात्र काही घटक वातावरणात पेट घेतात पण पूर्ण न जळता धातू राहून तो जमिनीवर पडतो त्यास अशमी म्हणतात.
उल्का पाहण्याची स्थिती कशी असेल?
पूर्वेला तुम्ही उल्कापात पाहू शकता.त्या रात्री चंद्र प्रकाशित असेल त्यामुळे उल्कापात कमी प्रमाणात दिसतील मात्र चंद्रास्त झाल्यानंतर उल्का वाटाणा ते बॉल च्या आकाराच्या पाहवयास मिळू शकतात.तुमची वर पाहण्याची इच्छा शक्ती असे पर्यंत तुम्हाला उल्कापात दिसू शकतो.मात्र त्यांचा निश्चित वेळ कोणता असेल हे सांगता येणार नाही.
आकाशगंगा निरीक्षण केंद्रातून आम्ही उल्कापात दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत.शनिवारी 17 आणि रविवार 18 च्या रात्री हे पाहण्याची संधी मिळणार आहे.या केंद्रावर उल्कापात पाहण्यासाठी आम्ही दुर्बिणीची व्यवस्था केली आहे.ही पर्यटकाना व खगोल अभ्यासकांना एक महत्वपूर्ण पर्वणी आहे.
शैलेश संसारे,संचालक आकाशगंगा प्रकल्प
महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्ये पहिली नगरपालिका आहे जी फिरण्याबरोबर विज्ञान विषयक आकाशगंगा प्रकल्प उभारला आहे.आता उल्कापात पाहण्याची पर्यटकाना खास पर्वणी असणार आहे.यासाठी आम्ही जोमाने काम सुरू केले आहे.ही उल्कापात पाहण्यासाठी जास्तीतजास्त पर्यटकांनी उपस्थिती दाखवावी.असे आवाहन प्रेरणा प्रसाद सावंत,नगराध्यक्षा यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment