शिर्डी संस्थानकडून सरकारला, बिनव्याजी पाचशे कोटीचे कर्ज..... - In India Live

Breaking News

03/12/2018

शिर्डी संस्थानकडून सरकारला, बिनव्याजी पाचशे कोटीचे कर्ज.....

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई : दि.2 महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात सापडले असून निळवंडे येथील सिंचन समस्या सोडवण्यासाठी शिर्डी संस्थानकडे हात पसरण्याची वेळ सकारवर आली आहे. शिर्डी संस्थानने पाचशे कोटी रूपये सरकारला बिनव्याजी कर्ज म्हणून दिले आहेत. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी यास मंजुरी दिली आहे. विरोधकांकडून याप्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली जाण्याची शक्यता आहे.
शिर्डी परिसरातील चार तालुक्यांची पाणी समस्या सुटण्यास या कर्जाची मदत होईल. आतापर्यंत कोणत्याही देवस्थानकडून सरकारवर अशी मदत घेण्याची पाळी आली नव्हती. या कर्जफेडीसाठी कोणताही कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही.निळवंडे सिंचन प्रकल्प अनेक दिवसांपासून रखडला असून त्याची किंमत १२०० कोटी रूपये आहे. यातील ५०० कोटी रूपये शिर्डी संस्थानकडून दिले गेले आहेत.
शिर्डीमध्ये दररोज ७० हजार भाविक येत असतात तर उत्सवाच्या काळात साडे तीन लाखांपर्यंत त्यांची संख्या जाते. त्यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. या निधीतून ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण पाणी टंचाई सोडवण्यासाठी एखाद्या धार्मिक संस्थानकडून कर्ज घेण्याची वेळ सरकारवर प्रथमच आली आहे 

No comments:

Post a Comment