महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार - In India Live

Breaking News

19/03/2019

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह

मुंबईदि. 19 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदार संघात राज्यात सर्वाधिक सुमारे 23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरूष मतदारांची संख्या आहे.

राज्यात दि. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात चार कोटी 57 लाखांहून अधिक पुरूष मतदार असून चार कोटी सोळा लाखाहून अधिक महिला मतदार आहेत.

नऊ मतदारसंघ राखीव

नंदूरबार, गडचिरोली-चिमूर,दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

नागपूर, शिरूर,पुणे, बारामतीत 20 लाखांहून अधिक मतदार

मावळ मतदारसंघात सुमारे 22 लाखांहून अधिक शिरूर 21 लाखांहून अधिक,नागपूर 21लाखांहून अधिक,पुणे आणि बारामती मध्ये प्रत्येकी 20लाखांहून अधिक मतदार आहेत.

मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात 16 लाखांहून अधिक मतदार असून मुंबई-उत्तर दक्षिण मतदारसंघात 16 लाख 98 हजार मतदार आहेत. तर मुंबई-उत्तर पूर्व मतदारसंघात 15 लाख 58 हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात 16 लाख 48 हजार आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 14 लाख 15 हजार एवढे मतदार आहेत.

 मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या (सुमारे) :नंदूरबार-18 लाख 50 हजार,धुळे-18 लाख 74 हजार, जळगाव-19 लाख 10 हजार,रावेर-17 लाख 60 हजार, बुलढाणा-17 लाख 46 हजार,अकोला-18 लाख 54 हजार,अमरावती-18 लाख 12 हजार,वर्धा-17 लाख 23 हजार,रामटेक-18 लाख 97 हजार,भंडारा-गोंदिया-17 लाख 91 हजार,गडचिरोली-चिमूर-15 लाख 68 हजार,चंद्रपूर-18 लाख 90 हजार,यवतमाळ-वाशिम-18 लाख 90 हजार, हिंगोली-17 लाख 16 हजार,नांदेड-17 लाख, परभणी-19 लाख 70 हजार,जालना-18 लाख 43 हजार,औरंगाबाद-18 लाख 57 हजार,दिंडोरी-17 लाख नाशिक-18 लाख 51 हजार,पालघर-18 लाख 13 हजार,भिवंडी-18 लाख 58 हजार,कल्याण-19 लाख 27 हजार,रायगड-16 लाख 37 हजार,अहमदनगर-18 लाख 31 हजा,शिर्डी-15 लाख 61 हजार,बीड-20 लाख 28 हजार,उस्मानाबाद-18 लाख 71 हजा,लातूर-18 लाख 60 हजार,सोलापूर-18 लाख 20 हजार,माढा-18 लाख 86 हजार,सांगली-17 लाख 92 हजार,सातारा-18 लाख 23 हजार,रत्नागिरी सिंधुदुर्ग-14 लाख 40 हजार, कोल्हापूर-18 लाख 68 हजार आणि हातकणंगले-17 लाख 65 हजार.

No comments:

Post a Comment