लिंबू सरबत पिणाऱ्यांनो सावधान - In India Live

Breaking News

27/03/2019

लिंबू सरबत पिणाऱ्यांनो सावधान


संघर्ष गांगुर्डे,इन इंडिया लाईव्ह
मुंबई.दि 26 कुर्ला स्थानकावर लिंबू सरबत बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अस्वच्छ पाण्याच्या टाकीतून पाणी घेऊन  लिंबू सरबत बनवत असल्याचे दिसत आहे.हा व्हिडीओ पाहिल्या नंतर प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच तेजस्विनी महिला रेल्वे प्रवाशी संघटनेच्या पदाधिकारी श्वेता मोहिते यांनी या घटनेची निंदा करत थेट रेल्वे विभाघातील खाद्यपदार्थ निरीक्षण अधिकारी यांचे नियंत्रण नसल्यामुळे सदर चा प्रकार घडला असल्याचा आरोप केला आहे,तर रेल्वे प्रवाशी मित्र संघटने चे प्रसिध्दी प्रमुख  शैलेश राऊत यांनी या घटने बद्दल ची बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. व सदर घटनेबद्दल सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे,रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या दोन्ही संघटनेच्या मागण्यावरून,पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून,आर्थिक दंड किंवा परवाना रद्द करण्यात येण्याची शिक्षा देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment