मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे VVPAT चे प्रात्यक्षिक संपन्न - In India Live

Breaking News

28/03/2019

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे VVPAT चे प्रात्यक्षिक संपन्न

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह
मुंबई, दि 27 - मतदाराने केलेले मतदान त्याच्या पंसतीच्या उमेदवाराला झाले की नाही,याची खात्री पटवून देणाऱ्या VVPAT (व्हीव्हीपॅट) मशीनचे प्रात्यक्षिक मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातील सर्व पत्रकारांना मंत्रालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

मतदारांनी आपले मत ज्या कुठल्या उमेदवाराला दिले आहे त्या उमेदवाराचे नाव, त्याचा पक्ष तसेच त्याचे चिन्ह 7 सेकंदापर्यंत व्हीव्हीपॅट मशीनच्या स्क्रीनवर फक्त मतदान करणाऱ्या मतदाराला बघता येणार आहे. ज्यामुळे पसंतीच्या उमेदवाराला केलेले मतदान झाले की नाही याची खात्री या मशीनमुळे संबंधित मतदाराला करता येणार आहे. यामध्ये मतदाराचा अनुक्रंमाक, नाव याची कुठलीही माहिती या स्क्रीनवर दिसणार नाही. मतदाराने मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर कंट्रोल युनिट हे मतदान केंद्र अध्यक्ष यांच्याकडे तर व्हीव्हीपॅट मशीन व बॅलेट युनिट हे मतदार ज्या ठिकाणी मतदान करणार आहे तिथे ठेवले जाणार आहे. 1400 मतदार क्षमतेचे हे व्हीव्हीपॅट मशीन प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात येणार आहे.
सहाय्यक संचालक प्रदिप केदार यांच्या पथकाने हे प्रात्यक्षिके सादर केले.यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारणी सदस्य खंडूराज गायकवाड,नेहा पुरोव मनिषा रेगे,प्रफुल चव्हाण,राजू झनके,पंकज दळवी, व इतर प्रसार माध्यम प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते 

No comments:

Post a Comment