कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या संघटक पदी अरुण वर्मा यांची नियुक्ती - In India Live

Breaking News

09/04/2019

कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या संघटक पदी अरुण वर्मा यांची नियुक्ती

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह
उल्हासनगर.दि 12 मार्च 2019 रोजी कोकण विभाग  रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या वतीने रिक्षा-टॅक्सी चालक मालक यांचा मेळाव्याचे आयोजन उल्हासनगर सी - ब्लॉक परिसरात करण्यात आले होते, त्यावेळी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी समाज सेवक अरुण रामसिंग वर्मा यांची कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघात संघटक या पदाची घोषणा करत,त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्य व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला संबोधित करताना अध्यक्ष प्रकाश पेणकर म्हणाले की सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड, ठाणे,व पालघर या शहरामध्ये जवळपास लाखो रिक्षा चालक मालक,शहरवासीयांना सेवा देत आहेत,रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत.अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या शहर प्रवासी सेवेमध्ये उतरल्या आहेत, अशा कंपन्यांना शासनकर्ते ही बिनदिक्कत परवानग्या देत आहेत,परंतु आपल्याला अगदी गल्ली पासून सेवा देणारा, आपला रिक्षा चालक मालक बांधव त्यांचेे दैनंदिन घर देखील चालवू शकत नाही,अशी मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.या रिक्षा चालकांच्या प्रश्नांना हात घालण्यास कोणीही तयार नाही.अशा वेळी या रिक्षा चालकांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी मजबुतीने लढण्याची गरज आहे,
त्यामुळे  30 ते 35 वर्षाचा अनुभव असलेले हे वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून गरीब लाचार लोकांची मदत करत असणारे अरुण रामसिंग वर्मा यांची कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघात संघटक  पदी नियुक्ती केली असल्याचे सांगितले,त्यांच्या या मदत कार्याला बळ मिळावे या करीता कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचा पूर्ण पाठिंबा राहील,असेही ते म्हणाले
अरुण रामसिंग वर्मा यांनी महासंघाचे संघटक  पद स्वीकारल्या नंतर मेळाव्यातील चालक मालक यांना म्हणाले की महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार  घेतला असून,रिक्षा चालकांना जाणीवपूर्वक  त्रास देणाऱ्या पोलीस,आर टी ओ,मनपा,या विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,तसेच रिक्षा चालकांची घरकुल योजना,पतसंस्था,आरोग्य विमा,रिक्षा चालकमालकांचे महामंडळ,पाल्यांसाठी शिक्षणात सवलत,इत्यादी अत्यंत महत्वाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनस्तरावर संघटित होऊन लढा देण्याचे ठरविले आहे,असे अरुण रामसिंग वर्मा यांनी सांगितले,तसेच या कार्यक्रमाला  प्रमुख उपस्थिति शिवसेना उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी,महासंघ सचिव संतोष नवले,पिंकी बुल्लर,बाला भोईर,प्रकाश बनकर,विजय साळवी,शेखर यादव,संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment