प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई. दि. १८ एप्रिल २०१९ लातूर मतदारसंघात मतदान सुरु असताना भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करावी आणि संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे एका मतदान केंद्राबाहेर मोबाईलच्या स्पीकर फोनवरून राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बोलताना पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने मतदार मतदान करत नाहीत असे सांग्तले तेव्हा संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाटील यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी बोलून पीकविम्याचे पैसे देतो असे आश्वासन दिले. मतदान सुरु असताना अशा पद्धतीने मतदारांना प्रलोभन देणे हा आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने संभाजी पाटील निलंगेकर व उमेदवार सुधाकर शृगांरे यांच्यावर आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.
No comments:
Post a Comment