बनावट कागदपत्र बनवणाऱ्या वकीलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - In India Live

Breaking News

13/04/2019

बनावट कागदपत्र बनवणाऱ्या वकीलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
कल्याण-दि,13 कोकण आयुक्त यांच्या नावाचे बनावट शिक्के व कागद पत्र बनविण्याच्या आरोपावरून वकील गणेश घोलप  याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.आरोपी घोलपला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता,कल्याण न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार महात्मा फुले पोलीस हद्दीतील सागर भदोरिया याला परिमंडळ ३ ने हद्दपार केले होते. सागर भदोरीया याने वकील गणेश घोलप याच्याकडे  हद्दपार आदेश रद्द करण्याचे आदेश मिळवून देण्यासाठी विनंती केली होती

गणेश घोलप याने बनावट  कागदावर कोकण आयुक्त यांचे शिक्के मारून सागर भदोरियाला दिले. या बनावट  कागदपत्रांच्या आधारे हद्दपार आरोपी सागर भदोरिया हा कल्याण परिमंडळात वावरत असल्याचे महात्मा फुले पोलिसांना समजले पोलिसांनी सागरची चौकशी केली त्यावेळी सागरने त्याच्यावरील हद्दपारी रद्द झाले असल्याचे पत्र पोलिसांना दाखवले,परंतु सागर कडे असलेल्या पत्राची पोलिसांनी सखोल चौकशी केली आसता ते पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले,त्यामुळे आरोपी सागर भदोरियाला पोलिसांनी  पत्राची विचारणा केली असता वकील गणेश घोलपनेे हे बनावट पत्र दिल्याचे सांगितले, कोकण आयुक्त यांचे
बनावट शिक्के व कागदपत्रे वापरल्या प्रकरणी वकील गणेश घोलप याच्या विरोधात 420 प्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता,कल्याण न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.मात्र कायदे तज्ञ ज़र अशा प्रकारे बनावट काग़द पत्र बनवत असतील तर सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवावा अशी चर्चा  सामान्य लोकात होत असल्याचे दिसून येत आहे

No comments:

Post a Comment