उर्मिलाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी,हिंदुच्या भावना दुखावल्याचा आरोप - In India Live

Breaking News

09/04/2019

उर्मिलाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी,हिंदुच्या भावना दुखावल्याचा आरोप

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह
मुंबई, दि,09  अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात, राष्ट्रमंथन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.राखी बरोड यांनी उल्हासनगर चे साहाय्यक पोलीस आयुक्तकडे तक्रारारी अर्ज दिला आहे, व तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी, इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान,बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते.त्यांच्या या वक्तव्यामूळे हिंदूूच्या भावना दुखावल्याचे सांगत, राष्ट्रमंथन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राखी बरोड यांनी या वक्तव्याला इंडिया टुडे या वृत्तवाहिनीवर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असणारे राजदीप सरदेसाई आणि राहूूल गांधी यांना ही जबाबदार ठरवले आहे.

राष्ट्रमंथन या सामाजिक संस्थेचे कायदे सल्लागार  
अ‍ॅड.राहुल चतुर्वेदी यांनी भा.द.वि. कलम 295अ, 298, 34 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

1 comment: