संघर्ष गांगुर्डे,इन इंडिया लाईव
मुंबई,दि,26 करांसाठी जीवावर उदार होऊन दहशतवाद्यांशी मुकाबला करून आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या पोलिसांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा सिंगचा निषेध शिवसेनेने का केला नाही? असा रोखठोक सवाल एड.बाळसाहेब आंबेडकर यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुर्ला पूर्व येथे केला.ते वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन महासभेत बोलत होते.
देशातील लोकसभा निवडणुकाच्या शेवटच्या टप्याचा प्रचार आटोपत असताना आज मुंबईत दोन ठिकाणी सभा होत्या.यात बांद्रा येथे भाजप-सेनेची सभा होती.या सभेत नेहमीची भाषणे करून शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांनी २०१४ चीच टेप वाजवली.आपण पाच वर्षे सत्ता देवून काय विकास केला? कोणता विकास केला? याबद्दल कुणीही ब्र शब्द काढायला तयार नसल्याचे दिसले.
तिसरीकडे नाशिकमध्ये मनसे नेते राज ठाकरे यांनी भाजपची व्हिडीओ लावून पुन्हा पोलखोल करून भाजप शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.राज ठाकरे यांनी कोणताही उमदेवार उभा केला नसल्याने त्यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणाला कंटाळून भाजपला सत्ता देणाऱ्या जनतेला वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पारडे अगोदरच जड झालेले आहे.
वंचित बहुजन आघाडीने समाजातील जातीपातीमधील उसवलेली सामाजिक वीण घट्ट करण्याचे काम केले आहे.इतर जातींना उमदेवारी दिल्याने त्यांना प्रतिनिधित्व देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे.यामुळे पुढील काळात इतर वंचित समाज घटकांचा विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
जनतेची फसवणूक करून शिवसेना-भाजप युतीने जनतेचा भ्रमनिरस केल्याची चर्चा मैदानातच रंगली होती.आता EVM घोटाळा झाला नाही तर भाजप-शिवसेनेच्या उमदेवारांना निवडून येता येईल की नाही असा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे.
एकूणच मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानामुळे शिवसेना भाजपला मुंबईतील जागांवर पाणी सोडावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

No comments:
Post a Comment