ईव्हीएम हटाव' आंदोलन, देशभरातील संघटना रस्त्यावर उतरणार - In India Live

Breaking News

15/07/2019

ईव्हीएम हटाव' आंदोलन, देशभरातील संघटना रस्त्यावर उतरणार

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव
नवी दिल्ली, दि.१४ जुलै.भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील "चले जाव "चळवळीच्या धर्तीवर येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभरात ईव्हीएम हटाव' आंदोलन करण्याची घोषणा ईव्हिएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने दिल्लीत करण्यात आली. आंदोलनाच्या वतीने रविवार १४ जुलै रोजी दिल्लीतील कॉन्स्टट्युशन क्लब मध्ये राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्रातील सरकार हे लोकांच्या मतावर निवडून आलेले नसून ते ईव्हीएम सरकार असल्याची टीका आंदोलनाचे निमंत्रक रवी भिलाणे यांनी केली आहे.
या ईव्हीएम सरकारने केलेली चोरी उघड झाली असून या विरोधात देशभरातील जन संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा निमंत्रक फिरोझ मिठीबोरवाला यांनी केली. या परिषदेत देशभरातील जनसंघटनांच्या प्रमुख नेत्यांबरोबरच बसपा खासदार दानिश अली, काँग्रेस चे माजी खासदार नाना पटोले, आप चे खासदार संजय सिंग, कम्युनिस्ट नेते डी .राजा,जनता दल(से.)चे नेते माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, समाजवादी पार्टीचे खासदार जावेद अली तसेच देशातल्या सोळा राज्यातून अनेक माजी आमदार,खासदार उपस्थित होते. ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचे निमंत्रक डॉ.सुनिलंम शबनम हाश्मी, धनंजय शिंदेआणि ज्योती बडेकर यांनी या वेळी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती दिली आली आहे.

No comments:

Post a Comment