आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत नेते आणि दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं आज सकाळी मुंबईत विक्रोळी इथं राहत्या घरी निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दुपारी १७ जुलै रोजी बारा वाजता दादर चैत्यभूमी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी दलित पँथर उभी केली. या संघटनेने आंतराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले. आंबेडकरी चळवळीचे नेते अशी त्यांची खास ओळख होती. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती
राजाभाऊ ढाले यांनी दलित साहित्यात संशोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर केले. चळवळीतील वास्तव, संघटनात्मक लिखाणाचेही काम त्यांनी केले. आंबेडकरी चळवळ ही विचारांची असली पाहिजे असं मानणारे राजाभाऊ ढाले होते. आणि त्याचे विश्लेषण करण्यात राजाभाऊ यांचे मोठे योगदान आहे.
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठं नुकसान झालं आहे. इन लाइव इडिया च्या संपूर्ण टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धाजली.
No comments:
Post a Comment