राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्याला ठोकल्या बेड्या - In India Live

Breaking News

23/07/2019

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

संघर्ष गांगुर्डे,इन इंडिया लाईव
कल्याण दि 23 राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या नावे बनावट ओळखपत्र बनवून त्यांचा गैरवापर करणाऱ्याला भामट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. लालमणी पांडे असे या गुन्हेगाराचे नाव असून त्यांनी किती जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन विवेक पानसरे यांनी केले आहे तसेच त्याच्या इतर साथीदारांचा शोध  लवकर घेण्यात येईल याची माहिती दिली. लालमणी पांडे हा नवी दिल्लीतील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नावाचा गैरवापर करीत असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचा अधिक तपास केल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. भारत सरकारच्या सोनेरी नावाचे आणि राजमुद्रा असलेले लेटरपॅड, व्हिजिटिंग कार्ड, ह्युमन राईट कमिशन महाराष्ट्र प्रेसिडेंटचे आयकार्ड आदी बनावट कागदपत्रे आरोपी जवळ  सापडल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नावाखाली या व्यक्तीकडून कोणाची लुबाडणूक किंवा फसवणूक झाली असल्यास कोळसेवाडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच लालमणीने इतरांनाही मानवाधिकार आयोगाचे बनावट नियुक्तीपत्र आणि आयकार्ड दिले असून त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे.दरम्यान आरोपी लालमणी पांडे याच्या  विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ,४२०४६५,४७१, तसेच एमबेलेम्स अँड नेम्स ऍक्ट १९५० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment