तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा तिवरे ग्रामस्थांची मागणी - In India Live

Breaking News

16/07/2019

तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा तिवरे ग्रामस्थांची मागणी

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई-१६ रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे  धरण दुर्घटनेप्रकरणी हे धरण बांधणारे कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिवरे ग्रामस्थांनी केली आहे . सोबतच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बुजून गेल्याने  येथील  ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे .
तिवरे धारण २ जुलै रोजी काळोख्या रात्रीत फुटल्यामुळे अनेक ग्रामस्थ, गुरे ढोरे आणि त्यांची घरे पुरात वाहून गेली .  यावेळी या गावाला भेट देऊन सांत्वन करणारे लोकप्रतिनिधी ,शासकीय अधिकारी व डॉक्टर पोलीस दलाचे व आर्थिक सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत . धारण फुटल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणाऱ्या नदीजवळील विहिरी दगडमाती आणि चिखलांनी बुजून गेल्यामुळे होणारी पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी या विहिरी युद्धपातळीवर स्वच्छ करून द्याव्यात या दरम्यान अन्य ठिकाणावरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी  मागणी तिवरे बौद्धजन विकास संघाचे पदाधिकारी आनंद गायकवाड ,सुदेश गायकवाड,संतोष गायकवाड,प्रकाश सावंत यांच्यासह तिवरे ग्रामस्थांनी  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे .
दरम्यान तिवरे धरणाचे निकृष्ट काम करून जीवित व वित्तहानीस जबाबदार असणारे धरणाचे कंत्राटदार व  या कामाकडे दुर्लक्ष करणा-या   पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या ग्रामस्थांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे 

No comments:

Post a Comment