288 पैकी उपस्थित 285 आमदारांची शपथ - In India Live

Breaking News

27/11/2019

288 पैकी उपस्थित 285 आमदारांची शपथ

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह 
मुंबई, दि. 27 : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना (दु.1 वा.पर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली. कोळंबकर यांना कालच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.
14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ वंदे मातरम् ने तर राष्ट्रगीताने समारोप झाला.

No comments:

Post a Comment