प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई दि. 21 जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार जगभरात 19 लाख व्यक्ती जन्मतः दृष्टिहीन आहेत तर त्यातील 1.4 लाख काही प्रमाणात अंध आहेत. नॅशनल प्रोग्रॅम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेसच्या मते, भारतात जन्मतः अंधत्व असलेल्या व्यक्तींच्या संख्येचे प्रमाण हे 10 हजार मागे 8 असे आहे. या पार्श्वभूमीवर दृष्टिहीन रुग्णांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता आमदार नसीम खान व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील चांदिवली येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गेल्या दोन महिन्यात 35 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
चांदिवली येथे प्रत्येक शनिवार व रविवारी हे नेत्र चिकित्सा सेवा शिबिरे घेण्यात आली.. मागील दोन महिन्यांपासून हे नेत्र चिकित्सा शिबिर सुरू असून 35 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. तर 25 हजार विनामूल्य चष्मा वाटप करण्यात आले असून मोतीबिंदू चे रुग्णही या शिबिरात मोठ्या प्रमाणात आढळले. गरीब, मोलमजुरी करणारे अनेक कुटुंब चांदिवली या भागात वास्तव्यास असून ज्या रुग्णांना शत्रकियेचा खर्च परवडत नाही अशा 2 हजार 500 रुग्णावरील मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. आजच्या घडीला एका डोळ्याची मोतीबिंदुच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 15 हजार ते 25 हजार मोजावे लागतात मात्र ही शस्त्रक्रिया रोटरी क्लबने नसीम खान यांच्या सहकार्यातून मोफत केली. गेली अनेक वर्षे चांदिवली येथे स्थानिक आमदारांच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रिया आयोजित केली जात असून आजही हे नेत्र शिबिर अविरत सुरू आहे. सायन रुग्णालयात या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती रोटरी क्लब आणि नसीम खान यांनी दिली.

No comments:
Post a Comment