प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह
नागपुर-१८ - राज्य विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरु असल्यामुळे शासकीय अधीकारी ,कर्मचारी दोन्ही सभागृहाचे आमदार स्यीय सहाय्यक व अभ्यागतांनी नागपुरातील शासकीय निवासस्थाने आणि खासजी हॉटेल्स फुल्ल झाले असतानाच आमदार निवासात दारूच्या बाटल्यांचा खच पाड्लासून रात्रीच्या या पार्ट्यांमुळे आमदारानं विशेषतः महिला आमदारांना या समस्यांचा सामना करावा अलगत असल्याची बाब समोर आली आहे . रात्रीच्या होत असलेल्या या ओल्या पार्ट्या आणि आमदारांना होत असलेल्या त्रासाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विधानसभा अध्यक्षांनी या घटनेची गांभीयाने दखल घेत कार्यवाही करण्याचे निर्देश सरकारला दिले .
अधिवेशन काळात नागपुरातील आमदार निवासात महाराष्ट्रभरातील सर्व आमदार व त्यांचे स्यीय सहाय्यक व त्यांचे अभ्यागत मुक्कामासाठी असतात यावेळी रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत हि मंडळी आमदार निवासात फिरून गोंधळ घालत असल्याची बाब आज आमदार सचिन कल्याण शेट्टी व महिला आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून देत कारवाईची मागणी केली
आमदार निवास खोली क्रमांक ७७ च्या समोर आवारात तीन अनोळखी ईसमांनी मध्यरात्री २.३० च्या सुमारास आपल्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोठावला.आपल्या स्वीय सहाय्यकाने दरवाजा उघडताच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन इसमांनी आपल्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रूपायाची मागणी केली.हे इसम मद्याच्या नशेत इतके धुंद होते की,त्यांना नीट बोलताही येत नव्हते. दरम्यान आपण सदर इसमांना आवर घालण्यासाठी पोलिसाकडे धाव घेतली तर एकही पोलिस जाग्यावर नव्हता.अशी माहिती सचिन काळशेट्टी यांनी सभागृहात दिली . सकाळी कर्तव्यावरील पोलिसांना याबाबत तक्रार केली असतं त्यांनी स्थानिक पोलिसात तक्रार करण्याचे माहिती त्यांनी दिली. त्यावर सर्व सभागृह अवाक झाले.
बेलापुर नवीमुंबई भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, आमदार निवासात काही मोजकेच आमदार राहतात तर बहुतेक आमदार हॉटेलात राहतात.माझ्यासह फक्त दोन तीन महिला आमदार आमदार निवासात राहतात तर आमदारांचे पीए व इतर लोक आमदारांच्या खोल्यात राहतात.सकाळी उठल्यावर ड्रमभर दारूच्या बाटल्या बाहेर टाकलेल्या दिसतात.त्यामुळे महिला आमदारांना असुरक्षीत वाटत आहे असे सांगत आम्हा महिला आमदारांना सुरक्षा द्यावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली. त्यावेळी या प्रकरणी गंभीर दखल घेत महिला आमदारांची विशेष काळजी घेण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment