महाराष्ट्र राज्यात गाय माता आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता - In India Live

Breaking News

19/12/2019

महाराष्ट्र राज्यात गाय माता आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह
नागपूर,दि. १९.काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर टिका करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारवर सडेतोड टिका केली होती.आपल्या ३६ मिनिटाच्या भाषणात तितक्याच तोडीसतोड शह्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत तोडीस तोड प्रत्यूत्तर दिले.यावेळी त्यांनी संताच्या वाणीचा आधार घेतला, आम्हालाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्तान हवा आहे, तुम्हाला हवा की नको ते ठरवा असे सांगत गोवंश हत्याबंदीचा कायदा देशातील सर्व राज्यांमध्ये का लागू करण्यात आला नाही,असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे गाय आणि हिंदुत्वाबातचे मत बेगडी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले. या वेळी त्यांनी गोवा राज्याचा आवर्जून उल्लेख केला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे गोमांवस खाण्याबाबतचे मत मांडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.माझ्या महाराष्ट्र राज्यात गाय माता, आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता, असा टोला हाणत मुख्यमंत्री म्हणाले की गोव्यामध्ये मी गोमांस कमी पडू देणार नाही असे दिवंगत मनोहर पर्रिकर हे बोलल्याचे हे सभागृहात सांगितले.

No comments:

Post a Comment