भारतातील ४७२ विद्यार्थी आयर्लंड येथील विद्यालयात पडलेत अडकून - In India Live

Breaking News

28/03/2020

भारतातील ४७२ विद्यार्थी आयर्लंड येथील विद्यालयात पडलेत अडकून

प्रफुल चव्हाण प्रतिनिधी
मुंबई दि. 28 एक - दोन वर्षांपासून विविध अभ्यासक्रमांसाठी आयर्लंड येथील आॅक्सफर्ड युनिवर्सिटी च्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात, वास्तव्यास राहून अभ्यास करीत आहेत. त्या साठी त्यांच्या पालकांनी, मुलांना चांगले शिक्षण मिळावे या करिता, काबाडकष्ट करून आर्थिकतेचे आयोजन केले आहे.पण सध्या जगभरात आलेल्या कोरोना च्या संकंटा मूळे चीन नंतर इटली, अमेरिका, स्पेन, जर्मनी, इराण व्यतिरिक्त इतर युरोपियन देशात ही शिरकाव करून हाहाकार माजवला आहे.

आयर्लंड ह्या ठिकाणी जगातील ख्यातनाम विश्वविद्यालय असल्याने जगभरातील विद्यार्थी येथे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात.मात्र कोरोना च्या साथीने ब्रिटेन चे पंतप्रधान, प्रिंस चार्ल्स व त्यांच्या पत्नी यांना ही लागण झाली असतांना, त्या मानाने इतर युरोपियन देंशा प्रमाणे इथे लागण कमी असल्याचे प्रमाण म्हणजे तिथे सुरू असलेले मॉल्स, पब्ज व इतर सार्वजनिक ठिकाणे आणि टोटल लाॅकडाऊन ची परिस्थिती ही ओढवलेली नाही.
 हाच त्यांचा हलगर्जीपणा त्यांच्या सह आमच्या ही जीवाशी येणार असल्याचे तेथील शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आपल्या पालकांकडे व्यक्त केले आहे.ह्या विद्यार्थ्यां पैकी अनेक जन ठाणे, डोंबिवली, मुंबई, पुणे, नागपूर व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्य़ातील आहेत.

तिथे ही सॅनेटायजर्स, मास्क व अनेक आरोग्य विषयक वस्तूंचा तुटवडा असून, विद्यार्थ्यांच्या पालकांनी भारतातून कुरियर ने पाठवलेली सामग्री अजून ही त्यांच्या पर्यंत पोहोचलेली नाही.
तेथील स्वच्छंदपणा व मनमर्जी पणे सूरू असलेले व्यव्हार आणि कोरोना विषयी नसलेले गांभीर्य, हा चिंतेचा विषय असल्याचे मत व भिती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.ह्या आस्ते व भिती पोटी भारतीय पालकांनी आयर्लंड येथील भारतीय दुतावासा बरोबर संपर्क साधला असता त्यांनी असे उत्तर दिले की, अजून इथे एवढा प्रकोप नसल्याने घाबरायचे काही कारण नाही, अमेरिका, स्पेन, जर्मनी येथील लोकांना आधी प्राथमिकता देऊन, त्यांना आधी विमानाने मायदेशी हलविण्यात येईल. त्याच बरोबर १.४० कोटी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असून आधी व्यवस्थित पणे क्वारंटांईन करूनच पुढचे पाऊल उचलले जाईल. त्याशिवाय येथील अनेक Lidl, Hse, Aldi प्रमाणे अनेक कंपन्यातून रोजगार उपलब्ध असून, इथेच काम काम करा असे ही सांगण्यात आले आहे.

त्याशिवाय राहत्या ठिकाणचे भाडे भरण्यासाठी PPRB योजने अंतर्गत भाड्याची तरतूद करण्या हेतू शासनाने त्या बाबत निर्देश दिले असल्याचे ही सांगितले आहे.सातत्याने ढासळत असलेली आयर्लंड ची परिस्थिती, आसूसलेले पालक व मायदेशी परतण्याची आस असलेले विद्यार्थी, ही परिस्थिती मन हेलवणारी असून, आता काय अमेरिका, इटली सारखी परिस्थिती झाल्या नंतर, आमच्या मुलांची सुटका करणार का? असा हताशपूर्ण सवाल पालकांनी केंद्र सरकार ला विचारला आहे.

No comments:

Post a Comment