कोरोना जनजागृती मोबाईल व्हॅनला मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट - In India Live

Breaking News

01/04/2020

कोरोना जनजागृती मोबाईल व्हॅनला मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट

प्रफुल चव्हाण प्रतिनिधी
मुंबई दि,01 डाॅ.हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठान चा सामाजिक उपक्रम..

सामाजिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि
डाॅ.हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठान लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "कोरोना जनजागृती अभियान" मुंबईत सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.ना.जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन प्रतिष्ठान च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या "कोरोना जनजागृती अभियान" या कार्यक्रमाचा आढावा घेतला.

अद्ययावत एल.ए.डी मोबाईल व्हॅन द्वारे मुंबई तील प्रमुख मुख्य ठिकावर "कोरोना विषाणू" संदर्भातील सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नागरिकांना सांगितले जात आहे. संचार बंदीत लोकांनी रस्त्यावर गर्दी करु नये,घरी बसूनच आपले कामे करावे सरकार ला सहकार्य
करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अभियानासाठी सह प्रायोजक सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन,बृन्हमुंबई महानगरपालिका मुंबई,ठाणे महानगरपालिका,नवी मुंबई महानगरपालिका,उल्हासनगर महानगरपालिका,अंबरनाथ नगरपालिका तसेच जय जगदंबा प्राॅडक्शन मुंबई,यांच्या विषेश सहकार्याने अभियान राबवण्यात येत आहे.

१८ मार्च २०२० सुरु झालेले कोरोना जनजागृती अभियान ३१ मार्च २०२० पर्यंत चालणार आहे,१७ मोबाईल व्हॅन आणि २६ स्वंयसेवक या अभियानात काम करत असल्याचे प्रतिष्ठान चे संस्थापक निवृत्ती यादव कार्याध्यक्ष मनोज
लोढा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment