व्हिडिओचा खरा प्रकार,खुद्द तृप्ती देसाई यांनीच उघड केला - In India Live

Breaking News

02/04/2020

व्हिडिओचा खरा प्रकार,खुद्द तृप्ती देसाई यांनीच उघड केला

मुंबई दि 02 (प्रफुल चव्हाण ) भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना लॉकडाउनच्या काळात दारू घेताना अटक करण्यात आले,असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. त्यामुळे यावरून सर्वत्र उलट-सुलट चर्चा होत असतानाच, यामागचा खरा प्रकार खुद्द तृप्ती देसाई यांनीच उघड केला आहे.
सोशल मीडियावर देसाई यांचा अटक करतानाचा फिरत असलेला व्हिडिओ हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे महाजनादेश यात्रेवेळी पुण्यात आले असता, दारूबंदी कायदा करावा या मागणीसाठी, मी दारूच्या रिकाम्या बाटलीचा हार त्यांच्या गळ्यात घालणार होते.परंतु पोलिसांनी तो दारूच्या बाटल्यांचा हार घालण्या अगोदर माझ्या ऑफिसमधून मला ताब्यात घेतले होते,असे देसाई यांनी या व्हिडीओ बद्दल माहिती दिली,देसाई पुढे म्हणाल्या की सदर व्हिडीओ हा कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकाने माझी बदनामी होईल या उद्देशाने वायरल केला असावा, महिलांवरील अत्याचारा विरोधात अनेकदा आंदोलने केली आहेत, गेल्या काही महिन्या पूर्वी महिलांच्या विरोधात टिप्पणी केल्या प्रकरणी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात आंदोलन केले होते, त्यामुळे त्यांचे समर्थकांमार्फत माझी अनेकदा बदनामी होईल असे कृत्य केलेलं दिसून आले आहे,तरीही मी या प्रकाराला भीक घालत नाही. विचारांची लढाई विचाराने लढायची असते,असे देसाई यांनी सांगीतले असून मी सायबर क्राईममध्ये जाऊन गुन्हा नोंद करणार आहे,असेही त्या म्हणाल्या आहेत .

1 comment:

  1. गुन्हा दाखल करणार आहे, अजून का नाही केला मग?

    ReplyDelete