मुंबई-दि.18 (प्रफुल चव्हाण) राज्य शासनाने वृत्तपत्र सुरू करण्यास परिपत्रक काढून 20 तारखे पासून परवानगी दिली असली तरी त्यावर वितरणास करण्यासाठी बंदी घातली आहे,
हे अन्यायकारक परिपत्रक मागे घेऊन वितरणासदेखील परवानगी देणारे सुधारीत परिपत्रक काढावे अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने केली आहे.
वृत्तपत्र वितरणाशिवाय सुरू करण्यास परवानगी देणे दुर्दैवी असून वितरणच होणार नसेल तर आधीच अडचणीत असलेली वृत्तपत्रे आणखीनच अडचणीत येतील.जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षीत असून वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे जाहिर केले आहे.असे असताना हा आदेश कशासाठी? हे परिपत्रक वृत्तपत्रांवरच नाही तर वृत्तपत्र वितरक आणि वाचकांवरही अन्याय करणारे आहे.जर पिज्झा आणि अन्य खाद्य पदार्थांची घरपोच सेवा दिली जात असेल तर वृत्तपत्रांनीच काय घोडे मारले आहे? त्यामुळे हे अन्यायकारक परिपत्रक राज्य सरकारने त्वरीत मागे घ्यावे व वृत्तपत्र वितरणास परवानगी देणारे सुधारित परिपत्रक तातडीने जारी करावे, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे व मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह अनिकेत जोशी यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment