उल्हासनगर, दि.4 (प्रफुल चव्हाण ) कोरोना महामारीच्या संकटास, देश लाॅक डाउन पद्धतीने सामोरे जात असतांना, तळहातावर पोट असलेल्या गोर गरीब जनतेवर ," इकडे आड तिकडे विहीर " अशा अवस्थेत उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना आधार म्हणून ह्युमन केअर चॅरिटेबल ट्रस्ट, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरूलकर व उल्हासनगरातील पत्रकारां तर्फे टिटवाळा येथील बनेली गावा शेजारील गोरगरीब आदिवासी जनतेला एक महिन्याचे अन्नधान्य वाटप करण्यात आले
सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरूलकर यांच्या पुढाकाराने मुंबई येथील ह्युमन केअर चॅरिटेबल ट्रस्ट, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकारांनी, टिटवाळा, बनेली गाव परिसरातील आदिवासी पाड्यातील गरीब जनतेला, " पीठ ते मीठ," असे एक महिन्याचे जीवनावश्यक खाद्यसामग्रींचे वाटप केले. सदर चे रॅशन हे उल्हासनगर येथून खरीदी करून वितरित करण्यात आले. पुढील काही दिवसात उल्हासनगर शहरातील तळहातावर पोट असलेली गरीब जनता त्यात प्रामुख्याने रिक्षा चालकांना सुद्धा अशाच पद्धतीने अन्न धान्य वाटप करण्यात येणार आहे.
वितरण कार्यक्रमात निवृत वपोनि दिपक कुरूलकर, भिम आर्मी ठाणे जिल्हा सचिव सुभाष भोसले, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब सव्वाखंडे, शशी सावंत, शांताराम अहिरे, उल्हासनगर शहरातील पत्रकार सुबोध गोंडाणे, बबन मनवर, टी गोपाळ, गोतम वाघ, सूनील आजगावकर, नितीन शर्मा आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment