मुंबई : दी.08, (प्रफुल चव्हाण) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मारहाण केलेल्या ठाण्याचे नागरिक अनंत करमुसे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जात असताना ठाणे पोलिसांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी खासदार किरिट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांना मुलुंड चेक नाक्यावर अडवले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही,असे पोलिसांनी दरेकर यांना सांगितले.संतापलेल्या दरेकर यांनी त्वरित ठाणे पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला.
मारहाणीत जखमी झालेल्या युवकाच्या प्रकृतीची विचारपूस करावयास जाणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी आयुक्तांना केला.मात्र,आयुक्तांनीही कायद्यावर बोट ठेवले.अखेरीस पोलिसांची सरकारच्या बाजूची भूमिका पाहुन,पोलिस यंत्रणा पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाही आहे की, ठोकशाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

No comments:
Post a Comment