माथेरान मध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी - In India Live

Breaking News

01/06/2021

माथेरान मध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी


सतोष खाडे, माथेरान
माथेरान,दि.३० धनगर समाजाच्या वतीने माथेरान मध्ये अहिल्याबाई होळकर जयंती कोरोनाच्या पार्श्व भूमीवर सर्व नियमाचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने साजरी केली.महात्मा गांधी मार्गावरील अहिल्याबाई होळकर चौकातील होळकर याच्या नाम फलकास धनगर समाजाचे जेष्ठ सदस्य रामचंद्र (बुवा) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर इंदिरा गांधी नगर येथील समाज मंदिरात समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी धनगर समाजाच्या सर्व बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करत ही जयंती अत्यांत साध्या पणात साजरी केली.
या वेळी नगरपरिषद चे सभागृह गटनेते प्रसाद सावंत नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे यांच्या सह अन्य  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment