संतोष खाडे, इन इंडिया लाईव्ह
माथेरान दि.२७ थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान मध्ये निवडणुकीला काही महिने उरलेले असताना.गरमागर्मीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे.येथील सत्ताधारी शिवसेनेच्या १७ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला.तसेच काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाहि समावेश आहे.
२०१६ मध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा तसेच १४ नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक असे एकूण १७ मिळून एकहाती सत्ता आणली होती.मात्र अंतर्गत नाराजी मुळे शिवसेनेच्या झेंड्याला उतरवत भाजप च कमळ घेऊन पुढे येणाऱ्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेना उपशर प्रमुख कुलदीप जाधव,शिवसेना शहर संघटक प्रवीण सकपाळ, शिवसेनेचे निष्ठावंत माजी नगरसेवक प्रदीप घावरे, डी ग्रुपचे अध्यक्ष किरण चौधरी, नगरसेवक संदीप कदम,राकेश चौधरी स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव ,नगरसेविका प्रियांका कदम,रुपाली आखाडे, सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, ज्योती सोनावळे यांनी शिवसेनेला रामराम करत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकाच खळबळ माजली आहे.

No comments:
Post a Comment