संतोष खाडे,माथेरान
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता माथेरानचे पर्यटन बंद करण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती आणि त्यामुळे तिला थोपवण्यासाठी मिशन ब्रेक द चेन सुरु करण्यात आले. त्यात लॉकडाऊन, जिल्हाबंदी असे कडक निर्बंध आणल्याने माथेरानचे पर्यटन ठप्प झाले. मात्र आता कोरोनाचा प्रभाव ओसरला आहे. तेव्हा माथेरानचे पर्यटन पुन्हा सुरु व्हावे यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी दिवसात माथेरानचे पर्यटन पुन्हा बहरण्याचे संकेत दिसत आहेत.
जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. माथेरानमध्ये प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. येथील स्थानिक कुटुंबांचा आर्थिक गाडा हा पूर्ण पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याने माथेरान पूर्णपणे वाहन मुक्त आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवर येथील घोडेवाले, हातरिक्षावाले, हॉटेल चालक, यासह येथे छोटेमोठे उद्योग करणारे सर्वेच आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. उन्हाळी सुट्टी, पावसाळा, दिवाळी, ख्रिसमस, नवीन वर्ष हे येथील पर्यटन हंगाम. यापैकी उन्हाळी सुट्टी व नवीन वर्ष हे येथील मुख्य पर्यटन हंगाम आहे. या पर्यटन हंगामावरच येथील कुटुंबांचे वर्षभराचे अर्थाजन अवलंबून असते. मात्र मागील वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना या विषाणूला थोपवण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे येथील आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली गेली. मिशन बिगिन अगेन सुरु झाले त्यानंतर माथेरानकर जुने सगळे विसरून पुन्हा कामाला लागले. मात्र मागील काही दिवसात कोरोनाची दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू लागला कर्जत तालुक्यात आणि माथेरानमध्येही कोरोना संक्रमित रुग्ण संख्या वाढू लागली. त्यासह आता संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाले आहे. त्यामुळे पर्यटकांनी माथेरानकडे पूर्णतः पाठ फिरवली. एप्रिल महिन्यापासून आजवर पर्यटकांसाठी माथेरान हे बंदच आहे. त्यामुळे माथेरानचा मुख्य उन्हाळी पर्यटन हंगाम पूर्णपणे निघून गेला. मात्र पावसाळी हंगाम तरी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेव्हा माथेरान व कर्जत तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्ण संख्या कमी झाले आहे. त्यामुळे माथेरानचे पर्यटन पुन्हा सुरु करा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आज रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट सुद्धा घेतली आहे. तेव्हा आगामी काही दिवसात माथेरानचे पर्यटन पुन्हा बहरेल असे संकेत आहेत. दरम्यान कोरोना नियमांचे कटाक्षाने पालन करीत पर्यटन व्यवसाय करण्यास माथेरानकर देखील तयार आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासन कधी निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्हा सध्या चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे पॉसिटीव्हिटी रेट कमी झाल्यास तसेच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाल्यास याबाबत निश्चित विचार केला जाईल, असे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, याांनी सांगितले

No comments:
Post a Comment