माथेरान मध्ये शिवसेनेचा वर्धापनदिन दणक्यात, शिवसैनिकांचा उत्साह शिगेला. - In India Live

Breaking News

10/06/2021

माथेरान मध्ये शिवसेनेचा वर्धापनदिन दणक्यात, शिवसैनिकांचा उत्साह शिगेला.


संतोष खाडे, माथेरान
माथेरान मध्ये जिथं निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कामाला लागले असताना सत्ताधारी शिवसेना शांत होती. ती आता आक्रमक होताना दिसत आहेत.शिवसेनेच्या 34 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन बाळासाहेबांचे विचार अंगिकारलेल्या सर्व शिवसैनिकानी वर्धापन दिन शिवसेना जनसंपर्क कार्यालयात दणक्यात साजरा केला.
नगराध्यक्ष प्रेरणा सावंत,गटनेते प्रसाद सावंत, महिला संघटक संगीता जांभळे जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे,प्रकाश सुतार,संदीप शिंदे,विवेक चौधरी उपस्थित होते.शिवसेना ही तळागळातल्या सर्व सामान्यांची आहे.इथे कोणाची मक्तेदारी नाही.फक्त शिवसेना या चार अक्षरावर प्रेम करणारे आपण आहोत.बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित आहोत.काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना सोडून गेले.पण यामुळं शिवसेना डगमगली नाही आज तरुण शिवसैनिकांची उपस्थिती उभारी देणारी ठरणारी आहे.असे जेष्ठ शिवसैनिक योगेश जाधव यांनी सांगितले.इतकी शिवसैनिकांची उपस्थिती ही या निवडणुकीच्या विजयाची नांदी आहे.असे ज्ञानेश्वर बागडे यांनी सांगितले.तर अवधूत येरफुल्ले यांनी आपल्या सर्वांमध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे असे सुचविले.
नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.या वेळी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत म्हणाल्या की वृक्षाची फांदी वादळात पडली म्हणून झाड मरत नाहीत.तर त्याला दुसरी पालवी फुटते.शिवसेनाही अशीच आहे कोणी गेले म्हणून शिवसेना थांबणार नाही.माथेरान मध्ये सर्वाधिक विकास हा गेल्या साडेचार वर्षात झालेला आहे.
या प्रसंगी तरुण शिवसैनिकांसह जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.मात्र शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी अनुपस्थित होते.त्यामुळे अनेक तर्कवितर्काना उधाण आले होते.जेष्ठ शिवसैनिक योगेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment