मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोविड पॉझिटिव्ह - In India Live

Breaking News

23/10/2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोविड पॉझिटिव्ह

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोविड 19 अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याचे शनिवारी सांगण्यात आले. यांचवेळी राज यांच्या आई कुंदा ठाकरे या देखील कोविड पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. 
राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना कोव्हिडची सौम्य लक्षणं आहेत. दरम्यान, राज ठाकरे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये  दाखल असून त्यांच्यावर कॉकटेल थेरपी करण्यात येणार असल्याचे लीलावती हॉस्पिटलचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले. तर आई घरीच उपचार घेत असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती. दरम्यान, राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांना सौम्य ताप आणि लक्षण दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. त्यामुळे चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. राज यांच्यासह त्यांच्या आईची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.
दरम्यान, राज ठाकरे कोरोनाबाधित आढळल्याने त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत.
राज ठाकरेंच्या आईने देखील शुक्रवारी लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांना करोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण (home quarantine) करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
“सध्या राज ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्यांच्यावर कॉकटेल थेरपी सुरु आहे. आगामी चार तासात त्यांना सोडण्यात येईल, “डॉ. जलील पारकर, लीलावती हॉस्पिटल

No comments:

Post a Comment