Mental Health Special : परिचर्या शिक्षण संस्था मुंबई जे जे रुग्णालय येथे, जागतिक मानसिक आरोग्य साप्ताह उत्साहात साजरा - In India Live

Breaking News

12/10/2023

Mental Health Special : परिचर्या शिक्षण संस्था मुंबई जे जे रुग्णालय येथे, जागतिक मानसिक आरोग्य साप्ताह उत्साहात साजरा

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव 
मुंबई दी.१२ दर वर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन १० ऑक्टोबर रोजी जग भरात साजरा कारण्यात 
येतो.त्या अनुषंगाने मानसिक आरोग्य सुदृढ राहावेयाबाबतची जनजागृती करण्यासाठी परिचारिका शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत, जे.जे रुग्णालय इमारतीच्या प्रांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 ऑक्टोबर मानसिक आरोग्य पोस्टर प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात आलीयावर्षाच्या घोषवाक्य नुसार २०० पेक्षा जास्त पोस्टर चे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे  परिचारिका शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या प्रतिभा मोरे  यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले,
कार्यक्रमा  साठी प्रादेशिक मनोरुग्णाल ठाणे येथील वरिष्ठ मानसोपचार तज्ञडॉ. अर्चना गडकरी या  प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या, तसेच महाविद्यालय चे प्राचार्य ज्ञानेश्वर राऊत,प्राध्यापिका सीमा सेथ राज, व शिक्षक वृंद  यांनी दीप प्रज्वलन करून, कार्यक्रमाची सुरुवात केली, या वर्षाच्या घोषवाक्य चे रिबन कापून उद्घाटन करण्यात आले.
उपस्थितांना मानसिक आरोग्य हा जागतिक मानवी हक्क आहे या घोष वाक्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले सप्ताह निमित्य राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. कॉलेजच्या विध्यार्थी यांनी ही आजच्या दिन विषयी ची माहिती दिली .तसेच मानसिक आरोग्य प्रतिज्ञा केली. सीमा सेत राज यांनी, जीवनात कामाच्या नियोजन बाबत तसेच, आपण निरोगी असल्यास आपल्या वागणुकी द्वारे सकारात्मक उर्जा निर्माण करू शकतो, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ गडकरी वरिष्ठ मानसोपचार तज्ञ यांनी रुग्णचे हक्क व मानसिक आजार चा गैरसमज वर अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले, वरील सर्व कार्यक्रम महाविद्यालांमध्येसर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मानसिक  आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला


No comments:

Post a Comment