प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
दि,११ ठाणे, दर वर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन १० ऑक्टोबर रोजी जग भरात साजरा कारण्यात येतो त्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना यांचा २०२३ च्या घोशवाक्य Mental is a universal human right या अनुसार प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे जनजागृती उदेशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, सर्वप्रथम मानसिक आरोग्य साप्ताहाची सुरुवात प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे ४ ऑक्टो रोजी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्याकरिता मानसिक आरोग्य पोस्टर प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते . कार्याक्रमाचे अध्यक्ष डॉ.नेताजी मुळीक वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे, यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम करण्यात आले, या कार्याक्रमाला, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, मंत्री साहेब, उपजिल्हाधिकारी ठोंबरे साहेब, डॉ. चाकूरकर साहेब, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ठाणे, तसेच डॉ. वाठवाणी वरिष्ठ मानसोपचार तज्ञ, डॉ प्राची चिवटे उपाधिक्षक, डॉ. अर्चना गडकरी, डॉ.कुसुमा, डॉ.योगिता दाटे, प्राचार्य लीना टोणगावकर, अधिसेविका अश्विनी शिंदे, या सर्व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती. मंत्री साहेब यांनी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, डी. पी . एन . कॉलेज च्या विध्यार्थी व इतर सर्व उपस्थितांना मानसिक आरोग्य हा जागतिक मानवी हक्क आहे या घोष वाक्या विषयी मार्गदर्शन केले. कार्याक्रमाचे अध्यक्ष डॉ. नेताजी मुळीक वैद्यकीय अधीक्षक,प्रा.म.रु.ठाणे यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त भाष्य करत असिस्टन्स अँड नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्स (Tele MANAS) म्हणजेच (टेली-मानस) उपक्रमची 24×7 टेली-मानसिक आरोग्य सेवा विषयी जनजागृती केली त्यामध्ये देशभरात मानसिक आरोग्या (Mental Health) विषयी जागरुकता निर्माम करणे तसेच प्रत्येक रुग्णापर्यत आवश्यक ती सेवा पोहचवणे हे टेली-मानसिक आरोग्य सेवेमागचे उदिष्ट आहे असे सांगण्यात आले .या टेलिमानसिक सेवांमध्ये समुपदेशन, तज्ञांचा सल्ला आणि ई-प्रिस्क्रिप्शन (E-Prescription) प्रदान करण्यात येते .तरी घरबसल्या या सेवेचा उपभोग घ्यायचा असल्यास हेल्पलाइन नंबर 14416 आणि 1-800-91-4416 वर कॉल (Call) करून तुम्ही सविस्तर महिती मिळवू शकता. त्यांत्या क्षेत्रातील प्रशिक्षित समुपदेशकाकडे तुमचा फोन हस्तांतरित केला जातो . आवश्यक असल्यास, तुमचा फोन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचार परिचारिका किंवा मानसोपचार तज्ज्ञांसारख्या मानसिक आरोग्य तज्ञांशी ऑनलाइन माध्यमातून जोडण्यात येतो या विषयी सविस्तर माहिती दिली, रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधा व मानसिक आरोग्य सप्ताह निमित्य राबविण्यात येणारे विविध ठिकाणी कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती व मार्गदर्शन केले.व डॉ. चिवटे यांनी मानसिक आजाराबाबत माहिती दिली.
५ ऑक्टोबर २३ रोजी रुग्णालयाची टीम द्वारे पोलीस बांधवाकरिता स्ट्रेस म्यनेजमेंट याविषयी पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले,
६ ऑक्टोबर २३ रोजी मा. न्यायालय ठाणे येथे पोस्टर प्रदर्शनी व डी. पी. एन. कॉलेज च्या विध्यार्थी आणि कर्मचारी यांनी न्यालायातील अधिकारी कर्मचारी व पब्लिक यांच्यासाठी, पथनाट्य,पोस्टर प्रदर्शन, स्लोगन स्पर्धा, वक्तृत स्पर्धा, घेण्यात आल्या, त्या मध्ये सुसूत्रता व नियोजन करून शिक्षकवृंद. सुजाता चौगुले, डॉ. योगिता देठे, यांनी मोलाचे योगदान दिले, शिक्षकवृंद सुजाता,तसेच सिस्टर शरण्या, शीतल, सतीश यांच्या सहकार्याने जनजागृती केली
दिनाक ०९ ऑक्टोबर २३ रोजी डोंबिवली येथील पोलीस बांधावाकरिता कार्यक्रमाचे आयोजन केले. डी. पी. एन. कॉलेज च्या विध्यार्थी यांची वकृत्व स्पर्धा आयोजित केली. तसेच रुग्णालय स्थरावरून रुग्णालयात रुग्णाकरिता व कार्मचार्याकरिता स्लोगन,रोल प्ले, वकृत्व स्पर्धा, असे विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम करून मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देऊन विविध माध्यमातून लोकांना मानसिक आरोग्याच्या हक्क व महत्वाविषयी जनजागृती करून संवेदन शीलता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. आठवडा भर आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे सांगता दिनाक १० ऑक्टोबर २३ रोजी मानसिक आरोग्य दिना निमित्त कार्याक्रमाचे चे उद्घाटन अध्यक्ष डॉ. नेताजी मुळीक वैद्यकीय अधीक्षक,प्रा.म.रु.ठाणे ह्यांनी संपूर्ण प्रा.म.रु.ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी यांनी जनजागृतीपर रैली रुग्णालयीन विध्यार्थी / विध्यार्थिनी व कर्मचारी ,अधिकारी, यांनी सहभागी होऊन काढण्यात आली त्यामध्ये मानसिक आरोग्या प्रा.म.रु.ठाणे च्या हक्का बाबत घोषणा देण्यात आल्या.तद्नंतर प्रा.म.रु.ठाणे येथे आठवडा भर आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
यात लीना टोणगावकर, प्राचार्य डी. पी.एन.कॉलेज यांनी दैनंदिन जीवनात कामाच्या नियोजन बाबत तसेच आपण निरोगी असल्यास आपल्या वागणुकी द्वारे सकारात्मक उर्जा निर्माण करू शकतो असे मार्गदर्शन केले.मा डॉ.गडकरी वरिष्ठ मानसोपचार तज्ञ यांनी रुग्णचे हक्क समाज्यात कसे मिळवून द्यवे, या बाबत माहिती दिली. कार्याक्रमाचे अध्यक्ष डॉ. नेताजी मुळीक वैद्यकीय अधीक्षक,प्रा.म.रु.ठाणे यांनी त्यांच्या अधिपत्या खाली सुरु झाल्याने सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत मनोरुग्ण तज्ञ परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील शिक्षणार्थी यांचा उपयोग मानसिक रुग्णसेवेकरिता वेगवेगळ्या स्तरावर देण्याकरिता उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, सर्व कार्यालय अधिकारी रुग्णालयीन कर्मचारी वर्ग, तांत्रिक वर्ग उपस्थित होते. वरील सर्व कार्यक्रम रुग्णालयीन सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मानसिक आरोग्य साप्ताह दिन उत्साहात साजरा करण्यात आला.





No comments:
Post a Comment