चंद्रपूर, दि. २३ जगातील राक्षसीवृत्तीवर सज्जनशक्ती नेहमीच विजय मिळवत राहतील, हाच संदेश विजयादशमीच्या सणातून हजारो वर्षे मिळत आला आहे. आजही हाच विश्वास विजयादशमीच्या दिवशी मनात जागवला पाहिजे, अश्या शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामांनी राक्षसराज दुष्ट रावणाचा निःपात केला तो ही दिवस. दुर्गादेवीने असुरांचा दुष्ट राजा महिषासुराचा वध केला तो ही दिवस. महिलांची ताकद, मातृत्वाची शक्ती दुर्गादेवीने हजारो वर्षांपूर्वीच दाखवून दिली आहे.
रावण तर दशग्रंथी विद्वान होता. मात्र त्याने संपूर्ण जगावर केलेले अत्याचार आणि त्याचे दुर्गुण यामुळे तो खलनायक म्हणूनच ओळखला गेला. रानात राहून साधी वल्कले नेसलेल्या आणि वानरांची सेना घेऊन आलेल्या श्रीराम आणि लक्ष्मणांनी जगज्जेत्या बलाढ्य रावणाचा पराभव केला, कारण श्रीराम सज्जन आणि मर्यादा पुरूषोत्तम होते. हाच विश्वास समाजात सतत जागविण्याचे कार्य विजयादशमीचा उत्सव करत असतो. हा विश्वास मनामनात जागविण्याचे काम जागतिक पातळीवर भारत करत आहे, तसाच तो स्थानिक पातळीवर आपण सर्वांनी करूया असे ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे म्हटले आहे.
No comments:
Post a Comment