प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
ठाणे दी. २९ ठाणे पोलीस आयुक्तालयाने करोनाच्या काळात केलेल्या कामगिरीचा भावनिक आढावा कोरोना काळातील विवेक या पुस्तकात लेखिका सौ.साधना योगेश जोशी यांनी घेतला आहे.कोरोनाच्या अतिशय प्रतिकूल काळामध्ये प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने कोणकोणत्या पद्धतीने आपापला मार्ग काढला आणि सर्व घटकांमध्ये समन्वय साधत एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. सामान्य जनतेपासून ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत मदतीचा हात घेत खाकी वर्दी अहोरात्र झटत राहिली.. दुर्दैवाने काही पोलीस कर्मचारी या युद्धात शहीद झाले.
काहींनी मृत्यूशी हस्तांदोलन करून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे किमया दाखवली तर काहींनी ही लढाई यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या कार्याची आणि निष्ठेची पावती दिली.. या सर्व कामगिरीचा लेखाजोखा या पुस्तकातून एका वेगळ्याच पद्धतीने मांडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोरोना काळात शहीद झालेल्या युद्धांना श्रद्धांजली अर्पण करून हा भावनिक लेख प्रपंच त्यांना समर्पित करण्यात आलेला आहे.. सदर पुस्तकाचे प्रकाशन बृहन्मुंबई पोलीस आयुक्त सन्माननीय श्री विवेक जी फणसळकर सर ठाण्याचे सहपोलीस आयुक्त सन्माननीय श्री दत्तात्रेय कराळे सर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री राजेश जी नार्वेकर सर आमदार संजय केळकर साहेब डॉक्टर महेश बेडेकर सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या उपस्थितीत पार पडला
No comments:
Post a Comment