Raigad Navratra Utsav रायगड प्रतिष्ठान आयोजित, रंगरास नवरात्र उत्सवाला, मुख्यमंत्र्यांची भेट - In India Live

Breaking News

22/10/2023

Raigad Navratra Utsav रायगड प्रतिष्ठान आयोजित, रंगरास नवरात्र उत्सवाला, मुख्यमंत्र्यांची भेट

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव 

मुंबई- दी- २२ भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात बोरिवली (प.) येथे रायगड प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'रंगरास नवरात्री उत्सव २०२३' ला शनिवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रंगरास नवरात्री उत्सवाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल आ. दरेकर यांचे कौतुकही केले.


याप्रसंगी गरबा रसिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील सरकारने सर्व मंदिरे, देव बंद केले होते. पण आपले सरकार आल्याआल्या सगळी मंदिरे उघडली. उत्सवावरील निर्बंध आपण काढून टाकले. सर्व जनतेच्या मनातील भावना ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राममंदिर बनवत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न ते पूर्ण करत आहेत यासाठी त्यांना धन्यवाद देतो.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायला शुभेच्छा देत म्हटले की, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नवीन सरकार आले. सनांवरचे सर्व निर्बंध दूर झाले. आजपासून दोन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा रास करता येणार आहे. आई जगदंबेला एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्हा सर्वांना शक्ती आणि ताकद मिळावी व विशेषत्वाने आ. प्रविण दरेकर यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एवढा सुंदर उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवात सहभागी झालेल्या सर्व जनतेचे, गरबा रसिकांचे अभिनंदन करतो.

दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही रंगरास नवरात्री उत्सवाला भेट दिली. यावेळी दरेकर यांनी त्यांना शाल आणि पुषगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनील राणे, भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, यश दरेकर, पिनाकीन शहा, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रंगरास नवरात्रौत्सवात सत्कार करताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, यश दरेकर, पिनाकीन शहा यांच्यासह आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.


No comments:

Post a Comment