प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
मुंबई,२३ राज्यात चार हजार कोटींच्या विविध योजना राबविणाऱ्या ओबीसी मंत्रालयात ओबीसी विभाग स्थापन होऊन आठ वर्ष झाली आहेत.किमान पाचशे कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त पाचच अधिकारी हे मंत्रालय हाकत असल्याने विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारला धारेवर धरलं असून नुसत्या घोषणा करण हे दिशाहीन सरकारचं काम असून काम कमी आणि घोषणा जास्त ही महायुती सरकारच्यां कामाची पद्धत असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत,काम कमी घोषणा जास्त
राज्यात सर्वात जास्त असलेल्या ओबीसींच्या योजनांची अंमबजावणी करण्यासाठी फक्त ५ अधिकारी सरकारकडे आहे. ओबीसी समाजाच्या योजना कागदावर पण जाहिरातबाजीसाठी मात्र सरकार तत्पर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.चार हजार कोटींचा असलेला हा विभाग , ३७० जागांच्या नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही.फक्त पाच अधिकारी हा विभाग चालवत आहेत, ओबीसी समाजाला असा न्याय सरकार देणार का?असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.नुसत्या घोषणा करायच्या, आश्वासन द्यायची प्रत्यक्षात कोणतीच कामे करायची नाहीत हाच या दिशाहीन सरकारचा कारभार असल्याची टीका श्री.वडेट्टीवार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment