प्रफुल चव्हाण इन इंडिया लाईव
मुंबई दि, ६ ऑगस्ट २०२५ कल्याण पश्चिमेतील चिकनघर येथील म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाची लवकरच सुरवात करणार असल्यासे प्रकल्प विकासाक श्रीकांत शितोळे, यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, तसेच श्रीकांत शितोळे पुढे म्हणाले की काही धोरणात्मक त्रुटींमुळे प्रकल्प पूर्ण करायला उशीर झाला आहे, परंतु सगळया तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या असून, मंजूरी सह वित्तीय मंजूरीही प्राप्त झाली आहे. या प्रकल्पात १२ संस्था आहेत त्यापैकी ११ संस्थातील ९९ टक्के सभासदांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे सर्वानी एकत्र.येऊन प्रकल्पाला पाठिंबा द्यावा हेच आमचे आवाहन आहे, प्रकल्पाच्या समर्थनार्थ बसलेल्या रहाईवाश्यांनी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याने आनंद उत्सव साजरा करत. चिकनघर म्हाडा पुनर्विकास समिती द्वारा पेढे वाटून आनंद व्यक्त केला.त्यावेळी विकासक श्रीकांत शितोळे तसेच विकासक संतोष पाटील हे देखील उपस्थित होते.

No comments:
Post a Comment