राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार - In India Live

Breaking News

03/12/2025

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते  रविवार १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये  पार पडणार  आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील,संस्कृतीकार्य मंत्री आशिष शेलार, सर्वश्री आमदार सुधीर मुनगंटीवार,अनिल परब, प्रसाद लाड,भास्कर जाधव, सुनील प्रभु, जितेंद्र आव्हाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, दीपक केसरकर, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दिनांक  13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार या सुट्टीच्या कालावधीत सभागृहाचे कामकाज होणार आहेबैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा  करण्यात आली.

No comments:

Post a Comment