घाटकोपरच्या श्री गांवदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अदिवासी पाड्यामध्ये शालेय वस्तूंचे वाटप - In India Live

Breaking News

29/10/2018

घाटकोपरच्या श्री गांवदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अदिवासी पाड्यामध्ये शालेय वस्तूंचे वाटप



विश्वनाथ खंदारे,

मुंबई : डोंगर, दऱ्या आणि अतिदुर्गम पट्ट्यात राहणाऱ्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी यंत्रणा नेहमी झटत असते. मात्र, सुविधांची वाणवा होत असल्याने सामाजिक जाणिवेतून अनेक संस्था या मुलांना मदतीचा हात देतात याचं हेतून मागील दोन वर्षापासून श्री गांवदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम) सामाजिक बांधिलकी जपत आहेत, यावर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. की 'एक वही, एक पेन व शालेय साहित्य' गणेशाच्या चरणी समर्पित करा. ते शालेय साहित्य आदिवासी मुलांपर्यंत मंडळामार्फत पोहोचवले जाईल, या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. जमा झालेल्या शालेय साहित्याची छानणी करून काल रविवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हा परिषद शाळा काटीचापाडा ता. वाडा जिल्हा जव्हार  येतील शिक्षण घेत असलेल्या १७० मुला-मुलींना शालेय वस्तू व दिवाळीनिमित्त सोनपापडी व बिस्किट वाटप करण्यात आले. त्यावेळी आदिवासींच्या चिल्ल्या-पिल्ल्यांचा आनंदाला उदान आले होते. हे कार्य यशस्वी होण्यासाठी वाडातील स्थानिक रहिवासी समिर नाईक व त्यांच्या सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले. अर्थिक सहकार्य सर्वांचे आभार अध्यक्ष सचिन तावडे यांनी आभार मानले.

1 comment:

  1. खुप छान काम करताय खंदारे दादा

    ReplyDelete