कल्याण : कल्याणात भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मुख्यमंत्र्यांनी भाषण तर केलेच मात्र भाषाणावेळी सभेतील खुर्च्या रिकाम्या होत्या. तर सभेला विलंब झाल्याने अनेक जणांनी वैतागून सभा सोडून जाणे पसंत केले.
या विजयी संकल्प सभेची वेळ ४ ची देण्यात आली होती. तर पाच वाजता मुख्यमंत्री येणार असे सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना यायला सुमारे सात वाजले. त्यामुळे सभा सुरु होण्यास तीन तास वेळ लागल्याने नागरिक वैतागले होते. दुपारपासून अनेक गृहिणी सभा स्थळी आल्या असल्याने संध्याकाळी ७ नंतर या गृहिणींनी आपल्या घरी जाणे पसंत केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. डिसेंबर २०१८ ला पंतप्रधान मोदी हे कल्याणात जेव्हा सभा घेतली त्यावेळी मोदींच्या भाषणा दरम्यान नागरिक निघून गेले होते. तर अर्ध्याहून अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. तीच परिस्थिती आजच्या भाषणात पाहायला मिळाली. त्यामुळे भाषणाच्या दिवशी लागलेली ही गळती निवडणुकीच्या दिवशी पण लागणार का अशी चर्चा सर्वत्र सुरु होती.
या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, भाजपचे कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, महेश चौगुले, गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, महापौर विनिता राणे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, विश्वनाथ भोईर, प्रल्हाद जाधव, दयानंद चोरघे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment