प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई, दि. 25 : लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी,कर्मचाऱ्यांना मतदानानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्याचे चुकीचे वृत्त समाजमाध्यमांवर विशेषत व्हॉट्सॲपवर पसरविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नसून सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment