मुंबई, दि. 16 : सोलापूर जिल्ह्यातील उजनी प्रकल्पांतर्गत पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित गावठाण पटवर्धन कुरोली येथील ग्रामपंचायत कार्यालय,शाळा संरक्षण भिंत, सिमेंट काँक्रीट गटार, बस स्थानक या नागरी सुविधांच्या कामांना मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी मान्यता दिली.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी चालू वर्षात निधी देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उजनी प्रकल्पांतर्गत पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित गावठाण सांगवी, बादलकोट कुरूली,मेंढापूर या गावाच्या नागरी सुविधा पुरवठा संदर्भात आढावा घेण्यात आला.

No comments:
Post a Comment