वयोवृद्ध कलावंताचे मानधन,थेट खात्यात जमा होणार. - In India Live

Breaking News

04/04/2020

वयोवृद्ध कलावंताचे मानधन,थेट खात्यात जमा होणार.

मुंबई (प्रफुल चव्हाण) गेले अनेक दिवसांपासून
सरकारी मानधनाकडे डोळे लावुन बसलेल्या वयोवृद्ध लोक कलावंताचे तीन महिन्याचे थकीत मानधन येत्या आठवडयात आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे.सुमारे २७ हजार वयोवृद्ध कलावंताना याचा लाभ मिळणार आहे.

सरकारच्या आर्थिक परिस्थितमुळे गेले अनेक महिन्यापासून वयोवृद्ध लोक कलावंताना वेळेवर मानधन मिळत नसल्याने अनेक गरीब लोक कलावंतांकडे आज घडीला औषधे घ्यायला सुद्धा खिशात पैसे नाहीत त्यामध्ये कोरोना सारख्या महामारी या आजारामुळे महाराष्ट्रातील लोकलावंतांवर आज उपासमारीची परिस्थिती ओढवली आहे.संपूर्ण कार्यक्रम बँद असल्याने आता कोणी कलावंत एकमेकांच्या मदत करायला तयार नाहीत.यातच गेले डिसेंबर महिन्यापासून सांस्कृतिक कार्य खात्याकडून या वयोवृद्ध लोक कलावंताचे हक्काचे मिळणारे मानधन त्यांच्या खात्यात जमा केले नसल्याने वयोवृद्ध कलावंतामध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.परंतु दोन दिवसांपूर्वी वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य खात्याला १३ कोटी रुपये वयोवृद्ध कलावंताचे थकीत मानधन देण्यासाठी निधी वितरित केला आहे.त्यामुळे येत्या आठवड्याभरात सुमारे २७ हजार वयोवृद्ध कलावंताचे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांचे थकीत मानधन आपल्या बँकेत जमा होणार आहे.

सप्टेंबर २०१९पासून सुधारित शासन निर्णयानुसार वयोवृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ झालेली असून "अ"श्रेणीतील वयोवृद्ध कलावंताला तीन हजार,१५० रुपये,"ब"श्रेणी साठी-दोन हजार,७०० रुपये आणि क श्रेणीतील लाभार्थ्यांना दोन हजार,२५० रुपये मानधन मिळणार आहे ज्येष्ठ लोककलावंत कै.विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार निवड समितीचे सदस्य खंडूराज गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना माहीत दिली आहे

No comments:

Post a Comment