लॉकडाउनच्या काळात गरिब कुटुंबाला,भीम आर्मी व ह्यूमन केअर चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीचा हात - In India Live

Breaking News

06/04/2020

लॉकडाउनच्या काळात गरिब कुटुंबाला,भीम आर्मी व ह्यूमन केअर चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीचा हात

खाद्यपदार्थ वाटप करताना सुभाष भोसले 
मुंबई दि 06 (प्रफुल चव्हाण ) कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात उल्हासनगर कॅम्प नंबर १ मधील भीमनगर व सह्याद्री कॉलोनी येथील गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये याकरिता 250 ते 300 कुटुंबाला भीम आर्मी व ह्यूमन केअर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गहू,तांदूळ,शेंगदाणा,साखर,बेसन,तूरडाळ,मटकीडाळ,मूगडाळ,बिस्कीटपुढे,हळद,जिरे,मोहरी,गोडेतेल,अंगाचा व कपड्यांचा साबन या प्रकारचे खाद्यपदार्थ व किराणा वाटप करण्यात आले,
उल्हासनगर सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक,तसेच ह्यूमन
केअर चॅरिटेबल ट्रस्टचे,दीपकजी कुरूलकर,भीम आर्मीचे ठाणे जिल्हा प्रमुख राजेशजी गवळी, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रजी कदम,भीम आर्मीचे ठाणे जिल्हा महासचिव सुभाष भोसले, ह्यूमन केअर चॅरिटेबल ट्रस्टचे समीरजी मोटरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या  खाद्यपदार्थ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला,या कार्यक्रमात
 प्रामुख्याने समाजसेविका.पूजाताई सुभाष भोसले, कु.ज्योती सुभाष भोसले, प्रवीण ननावरे, कु.रेखाताई ननावरे,सौ.
आशाताई मोरे, कु.पिंकी छापरू यांनी सहभाग घेतला आहे.


No comments:

Post a Comment