प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह
मुंबई दि.०१ पुरोगामी चळवळीतील सीमाताई पाटील आपल्या शाहिरीने सर्व महापुरुष आणि महाराष्ट्रामध्ये यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम करून त्यांचे विचार समाजात रुजवण्याचे काम व विविध घटकांचे प्रबोधन गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत अशोका विजयादशमी २५ ऑक्टोबर २०२० भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती सोहळा पार पडताच चैत्यभूमी दादर येथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्या नंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण नगरीत भीम आर्मीच्या वतीने सीमाताई पाटील यांचा पहीला सत्कार करण्यात आला आहे,
कल्याण येथील रेल्वे स्टेशन जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सीमाताई पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र कोअर कमिटी प्रमुख राजू झनके, कोअर कमिटी सदस्य ज्येष्ठ पत्रकार बाबा रामटेके, ज्येष्ठ कवी साहित्यिक विजय गरूड, भीमआर्मी महाराष्ट्र महासचिव सुनीलभाऊ गायकवाड, अविनाशजी गायकवाड, प्रचार प्रसिध्दीपरमुख कवी विचारवंत राजेश गवळी, ठाणे जिल्हा सचिव ज्योती भोसले, उल्हासनगर शहर अध्यक्ष कुमार पंजवानी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment