अजय कदम,माथेरान
दि.८ लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांवरही रोजच्या खाण्याचे संकट ओढावले आहे. विशेषत: माथेरान सारख्या ठिकाणी लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांचा खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुक्या प्राण्यांचे दु:खाची जाणीव ओळखून आनंद पवार व त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
माथेरान मध्ये एकूण 460 घोडा असून त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो.लॉकडाऊन लागल्यामुळे घोड्यांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत घोडेवाले असतानाच हायडॅक प्रायव्हेट लिमिटेड चे आनंद पवार यांनी येथील घोडेवाल्याना 250 बॅग्स भुसाचे वाटप केले पहिल्या टप्प्यामध्ये 125 बॅग्स दाखल झाल्या असून दोन दिवसात 125 बॅग्स दाखल होणार आहेत.या भुसा वाटपामुळे घोडेवाल्याना आधार मिळाला आहे.
याप्रसंगी महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या वाटपावेळी कर्जत पंचायत समितीचे पशुसंवर्धन विभागाचे किसन देशमुख,माथेरान पशुसंवर्धन अधिकारी अरुण राजपूत,स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम तसेच अश्वपालक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment