लॉक डाऊन नंतर मिनिट्रेन शटलच्या फेऱ्यात वाढ करावी : नगराध्यक्षा प्रेरणा सावंत - In India Live

Breaking News

10/06/2021

लॉक डाऊन नंतर मिनिट्रेन शटलच्या फेऱ्यात वाढ करावी : नगराध्यक्षा प्रेरणा सावंत

संतोष खाडे, माथेरान
सध्या लॉक डाऊन मध्ये अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान मिनिट्रेन शटल सेवेच्या दोन फेऱ्या होत आहेत. लॉक डाऊन मुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. परंतु केवळ दोन फेऱ्या असल्यामुळे संध्याकाळी नागरिकांना पायी चालत यावे लागते. लवकरच १५ जुननंतर माथेरान अनलॉक करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी होणार आहे.पर्यटनावर इथले सर्वांचे जनजीवन अवलंबून आहे.याच पार्श्वभूमीवर अमनलॉज स्टेशन ते माथेरान स्टेशन दरम्यान कमीतकमी सहा ते आठ फेऱ्या करण्यात याव्यात जेणेकरून इथे पावसाळ्यातील निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी शटल सेवेचा लाभ होऊ शकतो.दस्तुरी नाक्यावर खाजगी अथवा स्वतःच्या वाहनाने पर्यटक आल्यास त्यांना दस्तुरी नाक्यापासून गावात येण्यासाठी स्वस्त दरात शटल सेवा हाच एकमेव पर्याय आहे.त्यामुळे इथे अधिकाधिक पर्यटकांची संख्या वाढून इथल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ करावी या आशयाचे निवेदन माथेरान नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा तथा उत्तम प्रशासक प्रेरणा प्रसाद सावंत यांनी मावळ मतदार संघाचे कार्यशील खासदार श्रीरंग बारणे आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक याना दि.१० रोजी निवेदन सादर केले आहे त्यामुळे या शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ झाल्यानंतर निश्चितच पर्यटन वाढून सर्वांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

No comments:

Post a Comment