ठेकेदारांच्या कामचुकार पणाचा कळस,रस्त्यावर दगडी टाकल्यामुळे रुग्णवाहिकेला होत आहे अडथळा - In India Live

Breaking News

13/06/2021

ठेकेदारांच्या कामचुकार पणाचा कळस,रस्त्यावर दगडी टाकल्यामुळे रुग्णवाहिकेला होत आहे अडथळा

संतोष खाडे,माथेरा
सध्या माथेरान मध्ये नगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत.मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे मालवाहतूक ही छोट्या घोड्यांवर केली जाते.एका घोड्यावर 4 दगड टाकून ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी घोडेवाले माल घेऊन जातो व रस्त्यामध्ये टाकतो.हा दगड,रेती,सिमेंट हे रस्त्यावर पडून असते.ठेकेदार हा माल उचलत नाही परिणामी रुग्णांना घेऊन धावणाऱ्या रुग्णवाहिकेला होत अडथळ्यामुळे रुग्णांना व रुग्णवाहिका चालकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
माथेरानच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 37 कोटी 50 लाख रुपये इतका भरघोस निधी दिला आहे.त्यापैकी 25 कोटी रुपये हे अंतर्गत रस्त्यासाठी दिलेला आहे.त्याचे काम माथेरान मधील विविध ठिकाणी सुरू आहे.हे काम ठेकेदाराला दिल्या नंतर ठेकेदार मालाची ऑर्डर देऊन मोकळा होतो.घोडे वाले सुद्धा ज्यादा पैशाच्या मोबदल्यासाठी घोड्यावर आणलेला माल रस्तावर फेकून पळ काढतात.ठेकेदार व त्याचे कर्मचारी हा माल उचलत नाहीत व तो माल तिथेच पडून राहतो.
सध्या कोविड काळात रुग्णांना ने आण कर करण्यासाठी रुग्णवाहिका सतत धावत असते.रस्त्यावर रुग्णवाहिका आल्यास रस्त्यावर टाकलेल्या दगडी रुग्णवाहिका थांबवून चालकाला  उचलून इतरत्र टाकाव्या लागत आहेत.काही वेळा दगडी जास्त असल्यास एक एक तास चालकाला या दगडी रस्त्यावरून बाजूला कराव्या लागतात.तसेच मालवाहू घोडयावर लादलेल्या मालाच्या धकडेमुळे रुग्णवाहिकेची मोडतोड होत असते.याचा त्रास रुग्णाला फार मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.त्यामुळे रस्तावर पडलेल्या मालाबाबत ठेकेदारावर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
मी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत आहे.रुग्ण घेऊन जात असल्याना कस्तुरबा रोड येथे आल्यावर पाहिलं तर ठेकेदाराच्या दगडी,खडी गोन सर्वत्र टाकल्या आहेत.रुग्णवाहिका जाण्यास जागा नसल्याने मला त्या बाजूला हटवाव्या लागल्या.परिणामी खूप वेळ झाल्यामुळे त्याचा त्रास रुग्णाला सहन करावा लागला

No comments:

Post a Comment