अंबीवली बाळकृष्ण पेपर मिल्स विरोधात उपोषण - In India Live

Breaking News

14/09/2023

अंबीवली बाळकृष्ण पेपर मिल्स विरोधात उपोषण


प्रफुल चव्हाण इन इंडिया लाईव्ह
कल्याण / आंबिवलीच्या बंद असलेल्या बाळकृष्ण पेपर मिल समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. बाळकृष्ण पेपर मिल बरोबर झालेल्या करारात फसवणूक झाल्याचा आरोप या बाबत करण्यात आला असून या बाबत कनक ट्रेडर्स कडून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे . बाळकृष्ण पेपर मिल च्या गेट समोर सुरू असलेल्या या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

कनक ट्रेडर्सचे सी ई ओ कार्तिक काणू कंडू आणि त्यांचे सहकारी हे या उपोषणास बसले असून 
कनक टेड्रर्स बरोबरच्या फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे.या बाबत माहिती देताना कार्तिक काणू कंडू यांनी सांगितले की, २२०० मेट्रिक टन कंपनीचे समान उचलण्याचा करार झाला आहे. आता पर्यंत ८०० मेट्रिक टन माल उचलला गेला आहे.यातील १०० मेट्रिक टन माल कंपनीस परत करण्यात आला असून १३०० टन माल देण्यास बाळकृष्ण पेपर मिल कडून कनक ट्रेडर्स ला देण्यास नकार देण्यात आला आहे.या प्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याचा त्यांचा आरोप आहे.

आता या उपोषणा बाबत बाळकृष्ण पेपर मिल्स प्रशासन काय भूमिका घेते हे आता पाहावे लागेल.एकंदर १२ कोटीचा कनक ट्रेडर्स चा हा करार बाळकृष्ण पेपर मिल बरोबर झाला असून यात एक कोटी रुपये रोखा देण्यात आले असून बाकी रक्कम चेकने देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment